वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. श्री सिद्धेश्वर वूमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये “वाचन प्रेरणा दिन “ उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे. डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. त्या निमित्ताने महाविद्यालयीन युवतींकरिता लायब्ररी मध्ये पुस्तकांचे एक्सहिबिशन भरवण्यात आले होते. यासाठी विद्यार्थिनी तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.